राष्ट्रीय क्रीडा दिन अहवाल 2021

२९  ऑगस्ट या दिवशी हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून आज दिनाक ३०.०८.२०२१ रोजी अरिहंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कॅम्प व बावधन  महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  ध्यानचंद यांचे जीवनकार्य व विद्यार्थ्यानी अडचणींवर  कशी  मात करायची  या विषयावरव्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
            अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष मा. संजयजी मालपाणी सर  ,संस्थेचे संचालक मा. यशजी मालपाणी सर  ,मा. व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूषण पाटील सर ,प्राचार्य मा. डॉ. पुरुषोत्तम वडजे सर व डॉ. कांचन शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन व कॅम्प महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण  विभाग प्रमुख प्रा. अण्णा मोहिते सर व डॉ. गौतम शिंदे सर यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
            राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या व्याख्यानाचे प्रमुख मानबिंदू, व्याख्याते मा. डॉ. अरुण शिंदे सरयांनी अत्यंत प्रभावीपणे संघर्षमय जीवनाला सामोरे कसे जावे, विचार , भावना, कृती या गोष्टी जीवनात किती महत्त्वाच्या असतात. हे सांगताना दैनंदिन जीवनातील वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती केली.
            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दुर्गा दगडे  मॅडम,प्रास्ताविक प्रा.अण्णा मोहिते सर , व्याख्यातांचा परिचय डॉ. गौतम शिंदे सर ,तांत्रिक मदत प्रा.अनुपमा राणी मॅडम, प्रा.नेत्रली पाटील व अमृता पाटील आणि आभारप्रदर्शन प्रा. प्रीती शेलार मॅडम यांनी केले. तसेच बावधन व कॅम्प महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी बावधन व कॅम्प महाविद्यालयातील सर्व शाखेतील प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ . गौतम शिंदे                            प्रा .आण्णा मोहिते                                   डॉ .पुरुषोत्तम वडजे

शारीरिक शिक्षण संचालक               शारीरिक शिक्षण संचालक                                    प्राचार्य

Enquire Now