संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील तत्त्वज्ञानाचे समकालीन औचित्य

अहवाल

 अरिहंत एज्युकेशन फाऊंडेशनचे अरिहंत कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बावधन पुणे – २१ येथे आज बुधवार दि.१९/०१/२०२२ रोजी सकाळी ठीक १०.०० ते १२.०० या वेळेत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित ऑनलाईन ज्ञानोदय उपक्रमांतर्गत संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील तत्त्वज्ञानाचे समकालीन औचित्य या विषयांवर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूषण पाटील सर, प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वडजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्रा.दुर्गा दगडे व प्रा.आण्णा मोहिते यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते डॉ.पुरूषोत्तम जुन्ने (मराठी विभाग प्रमुख, गोदावरी कला वरिष्ठ महाविद्यालय,अंबड,जि. जालना ) लाभले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते डॉ.पुरूषोत्तम जुन्ने यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील  तत्त्वज्ञान खूप सुंदर अशा शब्दांत,वेगवेगळी उदाहरणे देऊन आपले मौलिक विचार मांडले.त्यांचे विचार हे जीवनाला एक दिशा देणारे होते .

या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्रा. प्रणाली  गायकवाड,अध्यक्ष परिचय प्रा.सोनाली बोलाखे,प्रमुख वक्ते परिचय प्रा.दुर्गा दगडे,आभारप्रदर्शन प्रा. अण्णा मोहिते यांनी केले .तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळाले .या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

प्रा.दुर्गा दगडे प्रा.आण्णा मोहिते डॉ. पुरुषोत्तम वडजे
(कार्यक्रम समन्वयक) (कार्यक्रम समन्वयक) (प्राचार्य)

Report

Arihant Education Foundation’s Arihant College Of Arts, Commerce & Science Bavdhan, Pune-21 has organized online lecture ‘Pasaydan-Saint Dnyaneshwar’s Philosophy’ on 19 January 2022, Wednesday.

The lecture was organized by the program coordinator Asst. Prof. Durga Dagade and Asst. Prof. Anna Mohite under the guidance of the managing director of the organization, Dr. Bhushan Patil Sir, Principal Dr. Purushottam Wadje Sir.
The speaker for this lecture was Dr. Purushottam Junne (Head of Marathi Department, Godavari Arts Senior College, Ambad, Dist. Jalna).Dr. Purushottam Wadje gave brief of the program..    The Managing Director Dr. Bhushan Patil Sir  gave valuable guidance to the students and wished them success. The  speaker of the program  Dr. Purushottam Junne presented his thoughts on the philosophy of Saint Dnyaneshwar’s Pasaydana in very beautiful words, giving different examples.    The host for this program is Asst. Prof. Pranali Gaikwad,. Asst. Prof. Sonali Bolakhe gave the introduction of MD sir, Asst. Prof. Durga Dagde gave the introduction of Speaker. Asst. Prof. Anna Mohite proposed vote of thanks . Faculty members gave valuable support. All the faculty and students of the college were present in the program.

Assi.Prof.Durga Dagade Assi.Prof.Anna Mohite Dr.Purushottam Wadje
(Program Incharge) (Program Incharge) (Principal)
Enquire Now