मराठी भाषा दिन

अरिहंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागांतर्गत ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा गौरव करण्याचा हा दिवस असतो. २७ फेब्रुवारी २०२६ या दिवशी सकाळी ११:३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. अनिता खैरे या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या. मराठी विभाग प्रमुख डॉ. तेजाली गवळी यांनी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवन व साहित्यिक कार्याबद्दल माहिती दिली. कु. सानिका उत्तरडे या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्व व संवर्धन याबद्दल आपली भूमिका मांडली. प्रा. शिवानी वर्मा यांनी मराठी ही एक संवादी व प्रभावी भाषा आहे, हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. अरिहंत बी.एड महाविद्यलायाच्या प्राचार्या व प्रमुख पाहुणे डॉ. अनिता खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.