मराठी भाषा पंधरवडा

अरिहंत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा पंधरवडा’ साजरा करण्यात येतो. अरिहंत महाविद्यालयात दि. १२ जानेवारी २०२६ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नियोजन डॉ. तेजाली गवळी यांनी केले. या उपक्रमात ग्रंथदिंडी, चलचित्राचे उद्घाटन, काव्यवाचन स्पर्धा, देवनागरी कॅलिग्राफी कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात आले.